तुकाराम समजणे म्हणजे जीवन जगण्याचा सोपा मार्ग समजणे
जीवन जगण्याचे अत्यंत साधे, सोपे मार्ग आपल्याला महापुरुष आणि संतपरंपरेनं दिले आहेत. मात्र हे सुलभीकरण मूठभर मार्तंडांची दुकानदारी संपवेल म्हणून समाजासमोर येणार नाहीत किंवा गूढ तत्त्वज्ञान म्हणूनच कसं येईल आणि पुन्हा हे तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी त्या कथित मार्तंडांचीच गरज कशी लागेल, अशी व्यवस्था जाणीवपूर्वक निर्माण केली गेली.......